tek marathi

baliraja

शनिवार, 18 जुलाई 2015

Bhashabharati

Bhashabharati

कवितांसाठि धुंडत होतो मि एक कोपरा

मासिकाच्या संहादकांना नको कोण नवखा

उदयानातुन फिरलो पहाया मिळतो का कोण श्रोता  

पेन्शनराचे अड्डे झाले,ज्येष्ठ नागरिक संघहि

ऐकुन घेति परंतु छद्मिपणाने नंतर हसति

कुणास सांगु कविता माझि,मर्म ज्यास उमजे

काहि कळेना अखेर परंतु एक मार्ग गवसला

आंतरजालि भाषाभारति नामक ब्लोग उघडला

                     क्रुष्णकुमार प्रधानkrishnakumarpradhan@gmail.com

मंगलवार, 12 मई 2015

क्रियाशिल व्रुध्दत्व

 भारतिय नागरिकांचे आयुर्मान 20व्या शतकाच्या सुरवातिस होते त्या मानाने दुप्पट झाले आहे असे एका डोक्टरांचे म्हणणे आहे.  अर्थातच त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचि संख्या वाढते आहे.ज्येष्ठ नागरिकाचे मुख्य प्रश्ण म्हणजे व्रुध्दत्वाने वाढते अनारोग्य,व एकचेपणाने येणारा मानसिक ताण.एकचेहणाचि दोन कारणे,एक म्हणजे नोकरितुन निव्रु त्त झाल्याने भरपुर रिकामा वेळ,व दुसरे म्हणजे शारिरिक अक्षमतेमुळे बाहेर जाणे कमि होउन घरात नाइलाजाने बसावे लागणे.
  ह्या डोक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे,महिलांचे अपेक्षित आयुर्मान 4,5 वर्षांनि जास्त आहे.  पण शहरातिल सुशिक्षित,नोकरि करुन घर सांभाळणार्या महिलांना कदाचित हा नियम लागु होणार नाहि.
     बन्मभर ज्या व्यक्तिबरोोबर आपलि सुखदु:खे शेअर केलि ति व्यक्ति जर आपल्या आयुष्यातुन निघुन गेलि,तर ति रिकामि झालेलि जागा दुसरि कोणचिच व्यक्ति घेउ शकत नाहि,तेव्हां मात्र एकटेपण घायला उठते.  मग अशा वेळि आपले मनस्वास्ध्य राखुन ठेवण्यासाठि माणसाने क्रियाशिल रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  त्यासाठिचि हि पंचतत्वे  
1 कितिहि त्रास पडला तरि तंदुरुस्त रहाण्यासाठि थोडा तरि व्यायाम करावा. रोज 30 मिनिटे तरि जलद चालावे,व समतोल आहार घेउन वजनहि नियंत्रणात ठेवावे,व अशक्तपणाहि येणार नाहि एवढि काळजि घ्यावि
2 प्राणायामाने मनावर आणि रागावर नियंत्रण छेवण्यास मदत होते.  ध्यान करण्यानेहि खुप फायदा होतो.  
3 मनाला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवा  पेपरमधिल कोडि,सुडोकु सोडवा.पुुर्वि केल्या नसतिल अशाहि गोष्टि,उदा गामे शिकणे,कविता कर्याचा प्रयत्नहि करा.त्यामुळे स्म्रुतिभंशाचि शक्य़ता थोडि कणि होइल.  
4  लोकात अदिक मिसळण्याचा प्रयत्न करा.ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्यत्व घतले नसेल तर घ्या  
5  आशावादि आणि आनंदि रहाण्याचा  प्रयत्न करा.चार लोकात गप्पा मारताना रोग आणि दु:खाचि चर्चा नको.
              सामाजिक,सांस्क्रुतिक कार्यात भाग घेणे हेच खरे क्रियशिल व्रुध्दत्व.  त्यामुळेच तुमच्या वैयक्तिक दु:खाचा तुम्हाला वीिसर पडु शकेल.

शुक्रवार, 1 मई 2015

 वसंत ऋतू --आल्हाददायक वारे जेव्हां   सुखवि ती मना  
गुढी उभारून  नवव र्षाचे स्वागत करू या वाटे  जना  
कोकीळ  अपुल्या मंजुळ स्वरे बोलावितो तिला ,
तेव्हां समजावे धरणीवरती वसंत ऋतू अवतरला .
विचार करणे ठाउक नसते आम्हासारखे पक्ष्यांना  
परी जाणीव कोठेतरी अंतरी सांगत असते त्यांना  
हीच वेळ खरी समागमाची नातर होईल काय  
अंडी घालण्या उशीर होईल,घरटे उसने मिळेल काय?  
मिळेल तरी ते असेल काउचे,पाउस पडता वहाणार    
उघडयावर  पडता पिले आपुली माउतोंडी जाणार
हा दूरचा विचार जरी का आपणास ना सुचणार  
निसर्ग देतो जरी न बुध्दी ,नेणीव पक्ष्या रुपणार