tek marathi

baliraja

सोमवार, 27 अगस्त 2012

gaNapati aaratee

गणापती तुझे ध्यान रम्य अति
होई पाहता गुंग ही मती .
चारण तुझे स्पर्शण्या मला दिसत नाही
पद्मासन  घालून बसलेली ही तुझी मूर्ती .
मनापासुनी परी तुजला करतो दंडवत
तुझ्या कृपेचे अभिलाषी मी व माझे पुत्रपौत्र
सात्विक अन्ने मोदकादि  असती तुझ्या प्रसादात
व्हावे आम्ही बलवान ,तुला वाटते ,बुद्धीला टाकू नये गहाण
आशीर्वाद तुझा घेण्या जागू आम्ही,खेळणार  ना जुगार
अनेक भक्त एकत्र जमतील ,वाढे शक्ती ,करू स्वातन्त्र्याचा एल्गार .
                                      कृष्णकुमार प्रधान  

शनिवार, 4 अगस्त 2012

mee kaa asaa

mee kaa asaa

जंगjजंग पछाडले तरी .           
रंग काही मिळेना ,
पूर्वी केला जंग जगाशी ,
आज सवंगडी मिळेना .
एका सवंग चालीतून aअंगणात  फिरताना,
दिसली tती अंगना
क्षणात नजर मिळताना
,खेळ माझा रंगला ,
दंग jझालो कधी कसा

माझे मला कळेना 
संसाराच्या अंगणी  ,फुटली किती   बांगडी
वर्षे कशी किती गेली उमजलेच नाही मला .
असे होता होता एके काळी
कोमेजली ती कळी ,
रुग्णालयाच्या खेपा झाल्या ,
अखेर बाकी सावल्या
संसाराची इतिश्री होता
मी विचारी देवाला ,
आळवीणया ही विराणी

ठेविलेस का मला ?  .