tek marathi

baliraja

बुधवार, 5 नवंबर 2008

gaarawaa

गारवा जीवाला हवा
सुखाचा एकमेव ठेवा [१]
दाहक वारे ग्रीष्मामधले
स्तब्ध करिती जीवन सारे
अशावेली तो झुळझुळणारा
देई झरा गारवा [1]
तनू तापते उष्ण हवेने
मनाही थकते अतिकामाने
अशावेळी ती झुळूक इवली
नष्ट करी शीनावा [२]
ग्रीष्म जाई मग हळुच सारोनी
मेघा दाटती नाभातुनी
हासता मग ते पानी शिम्पुनी
aअणतात गारवा [३]पुढे पहा )

gaarawaa

कधी हवा ती कुंद रहाते
जीवन त्याने मग कोंदतते
अशावेळी कुणी मधुररवाने
आनी पहा गारवा[४]
नैराश्याने पुरे ग्रासुनी
कुणी जातसे हताश होवूनी
अशावेळी तो सहानुभूतीचा
शब्द थारे गारवा[५]